अध्यक्षांचे मनोगत

आप्पा पराडकर
Share

 

संस्थेला सन २०१४ चा महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार प्राप्त झाला ही बाब गौरवास्पद आहे. १९८२ साली स्थापन झालेल्या या संस्थेस ३६ वर्षे पुर्ण होत असून या ३६ वर्षाच्या कालावधित सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्श असे सहकाराच्या माध्यमातून काम करित एक  वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.

संस्थेच्या ग्राहक भांडार क्र. ३ चे दि. २४/६/२०१६ रोजी नुतनीकरण करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला वातानुकुलित डिपार्टमेंट स्टोअर्स मालवणी बझार शाखा भंडारी हायस्कूल रोड मालवण येथे सुरू केलेला आहे.

सहकाराच्या माध्यमातून ग्राहक सेवा विनम्र व जलद सेवा ही उद्दीष्ट साध्य करीत संस्थेने मालवणी बझार मालवण मध्ये बारकोडिंग सेवा डिस्काउंट कार्ड सुविधा, एटीएमद्वारे मालखरेदी सुविधा शनिवार ऑफर्सच्या माध्यमातून वस्तुच्या दरात सवलत आदि सेवा सुविधा देण्याकडे भर दिलेला आहे. संस्थेने मालवणी बझार मालवण प्रमाणे ग्रामीण भागातील जनतेलाही सेवा सुविधा पुरविण्याच्या हेतूने मालवणी बझार आचरा, मालवणी बझार कट्टा या ठिकाणी ही  बारकोडिंग सेवा, डिस्काउंट सेवा एटीएमद्वारे माल खरेदी सेवा सुरू केलेली आहे.

संस्थेच्या ग्राहक सभासदांसाठी  ग्राहक ठेव योजना, मुदत ठेव योजना सुरू केलेली आहे.संस्थेच्या ग्राहक सभासदांचा या योजनेस ठेव रक्कम गुंतवणूक करून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापुढेही असेच सहकार्य करावे.

संस्थेच्या ज्या सभासदांनी संस्थेचे जास्तीत जास्त भाग खरेदी केलेले आहेत त्यांचे  आभार त्याचप्रमाणे संस्थेच्या सर्व सभासदांनी जास्तीत जास्त भाग खरेदी करून सहकार्य करावे. संस्थेने एका  भागाची किंमत ५००/- केली आहे. ज्या सभासदांचे भाग रू. ५००/-  पेक्षा कमी आहेत त्यांनी रू ५००/- च्या पटीत भाग करून, किमान रू.१०००/-  चे  भाग घेऊन सहकार्य करावे असे  सभासदांना आवाहन करीत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्श असा सहकार रूजवीत तालुक्यातील बेरोजगार तरूण – तरूणींना सहकाराच्या माध्यमातून रोजगार देण्याचे काम होत आहे. संस्था प्रामाणिक, गुणी व तळमळीच्या कामगाराबरोबरच मा.संचालक मंडळाच्या नियंत्रणामुळे यशस्वी वाटचाल करीत आहे.

संस्थेने मार्च २०१८ अखेर ८ कोटी ४९ लाख विक्रमी विक्री उलाढाल केलेली आहे.यावरून संस्था ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यास यशस्वी ठरलेली  आहे. संस्थेच्या मालवणी बझार या डिपार्टमेंट स्टोअर्सच्या शाखा अन्य तालुक्यात सुरू करण्यासाठी अनेक स्तरावरून मागणी होत आहे.परंतु शासनाकडून भागभांडवल प्राप्त झालेले नसल्याने शाखाविस्तार करता आलेला नाही यासाठी मेहरबान संचालक मंडळाचे प्रयत्न चालू आहेत.

संस्थे मार्फत ग्राहकांना, सभासदांना उत्तेजन मिळण्यासाठी सुलभ व जलद सेवा देण्यासाठी आधुनिकतेचा विचार करत त्या दृष्टीने बारकोडींग सेवा, डिस्काउंट सुविधेमार्फत सभासदांना  खरेदी केलेल्या मालावर तंतोतंत डिस्काउंट मिळण्याची सुविधा, ग्राहक भेट योजना, मिरची महोत्स्व, रोख सुट योजना, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, ग्राह्क ठेव योजना, सभासदांच्या मुलांचा गुणगौरव, संस्थेच्या कर्मचा-यांसाठी आदर्श कामगार पुरस्कार असे कार्यक्रम राबवून कर्मचा-यांमध्ये सहकार्यांची एकोप्याची भावना जोपासत आहे. यावर्षी सभासद भागभांडवल, ठेववाढ साठी मेहरबान संचालक मंडळास सभासद ग्राहकांनी चांगले सहकार्य केले आहे. व्यवसाय वाढीसाठी खेळते भाग भांडवल आवश्यक असल्याने, सभासद ठेवींमध्ये वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी आव्हान करण्यात येत असून सभासद बंधू- भगिनींनी सहकार्य करावे.

संस्थेच्या स्वमालकीच्या प्रॉपर्टीत व्यवसाय वाढीच्यादृष्टीने आधुनिकतेचा विचार करून, नवीन बांधकाम करून विकसित करण्याचे नवीन संचालक मंडळाचे धोरण आहे. त्यानुसार नवीन संचालक मंडळ उत्साहाने कामकाज करत आहेत.नियोजनात्मक धोरण प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

आतापर्यंत संस्थेच्या प्रत्येक उपक्रमास आपणा सर्वांचे जसे सहकार्य लाभत आले तसेच यापुढेही मिळत राहिल अशी  आशा  मी व माझे सर्व संचालक,सहका-यांना खात्रीपुर्वक वाटते व ते मिळावे ही विनंती.

संस्थेच्या यशात सर्व ग्राहक,सभासद,बंधू – भगिनी, ठेवीदार, मार्गदर्शक, संचालक, कर्मचारी वर्ग यांचा मोलाचा वाटा आहे. आपणा सर्वांकडून संस्थेला मिळत आलेले सहकार्य, विश्वास याबद्द्ल मी मन:पुर्वक आभार मानतो व अशाच प्रकारे सहकार्य अखंडितपणे मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो व संस्थेची प्रगती उत्तरोत्तर व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा आभार मानून हा अहवाल आपणापुढे नम्रपूर्वक सादर करीत आहे.

 

श्री. वि. गो. उर्फ आप्पा पराडकर.

अध्यक्ष.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *