मुख पृष्ठ

Share

देशामध्ये व राज्यामध्ये सहकारी ग्राहक संस्था अडचणी मध्ये असताना सहकाराची सर्व मुल्ये जपुन मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था दि. १८/१०/१९८२ रोजी स्थापन झाली. श्री. स्वार ईमारत सोमवार पेठ येथे संस्थेचे ग्राहक भांडार व कार्यालय सुरु झाले.

गेली ३२ वर्षे सभासद ग्राहकांस दर्जेदार माल माफक दरात पुरवित मालवण तालुक्यातील बाजारपेठेत आपले वर्चस्व टिकवुन असुन संस्थेची ३ डिपार्ट्मेंट स्टोअर्स, २ ग्राहक भांडारे व १ रेशन दुकान अशा ६ शाखांची विक्री उलाढाल ५ कोटी ७५ लाखाच्या वर झाली असुन संस्थेच्या विक्रीत मागील वर्षा पेक्षा ९ लाखाने वाढ झाली आहे. संस्थेचे संचालक, पदाधिकारी व सभासद यांच्या प्रबळ ईच्छा शक्ती व परीश्रमाने  ६ मार्च २०१४ रोजी ही भाडेतत्वावर घेतलेली ईमारत व त्यासभोवतालची जमिन एकुण क्षेत्र ७६४.२० चौ. मी. श्री. स्वार यांच्या वारसांकडुन खरेदी करण्यात आली. संस्थेची ही मालमत्ता मुख्य बाजार पेठेत असुन ती विकसीत करण्याचे धोरण संचालक मंडळाचे आहे.

दि. ३१/३/०१४ अखेरची सभासद संख्या ९९८ झाली आहे. त्यापैकी ९८४ व्यक्ती, १३ नाममात्र व १ महाराष्ट्र शासन अशी सभासद वर्गवारी आहे.

संस्थेकडे कायम३८ व हंगामी ९ असे एकुण ४७ कर्मचारी असुन संस्थेचे दैनंदीन कामकाज अत्यंत काटेकोरपणे व प्रभावीपणे केल्यामुळे संस्थेस ‘अ’ वर्ग मिळाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *