आमचे विषयी

Share

देशामध्ये व राज्यामध्ये सहकारी ग्राहक संस्था अडचणी मध्ये असताना सहकाराची सर्व मुल्ये जपुन मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था दि. १८/१०/१९८२ रोजी स्थापन झाली. श्री. स्वार ईमारत सोमवार पेठ येथे संस्थेचे ग्राहक भांडार व कार्यालय सुरु झाले. हळु हळु ग्राहक भांडाराचे रुपांतर डिपार्टमेंट्ल स्टोअर्स मध्ये झाले. संस्थेचे संचालक, पदाधिकारी व सभासद यांच्या प्रबळ ईच्छा शक्ती व परीश्रमाने  ६ मार्च २०१४ रोजी ही भाडेतत्वावर घेतलेली ईमारत व त्यासभोवतालची जमिन एकुण क्षेत्र ७६४.२० चौ. मी. श्री. स्वार यांच्या वारसांकडुन खरेदी करण्यात आली. संस्थेची ही मालमत्ता मुख्य बाजार पेठेत असुन ती विकसीत करण्याचे धोरण संचालक मंडळाचे आहे.

वैशिष्टे

कोकण सारख्या सहकार क्षेत्रांत यशस्वीपणे चालवलेली , सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणारी ग्राहक सहकारी संस्था

सतत २६ वर्षे नफ्यात व २६ वर्षे लाभांष वाटप

४७ कुटुंबाना रोजगार निर्मीती

संस्थेचे सर्व व्यवहार संग़णकीक्रुत व बारकोड सेवा पद्धती

संस्थेचे कर्मचारी सहकार व संगणक प्रशिक्षीत

ऑडीट वर्ग “अ”

घरपोच सेवा, उधार सेवापद्धत व “आदर्श कामगार पुरस्कार” योजना

सभासद, ग्राहक बंधु भगिनी व त्यांच्या गुणवान मुलांसाठी गौरव व शैक्षणिक उपक्रम आरोग्य शिबीरे, हळदीकुंकू समारंभ, मिरची मोहोत्सव, ग्राहक मेळावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *